

परभणीतील ७ हजार ८७० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
--
आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन
ॲग्रोवन वृत्तसेवा
परभणी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत जाहीर झालेल्या पहिल्या यादीतील परभणी जिल्ह्यातील सात हजार ८७० शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांत ६० कोटी चार लाख १० हजार ९६६ रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) विकास जगदाळे यांनी दिली.
कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळण्याची अपेक्षा आहे.
बँकांनी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ‘महा-आयटी’ पोर्टलवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दोन हजार ९८५ आणि राष्ट्रीयीकृत बँकांची एक लाख ५७ हजार ७८४ कर्जखाती नोंदविली आहेत. आधार प्रमाणीकरणासाठी (ई-केवायसी) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एक हजार ७३२ आणि राष्ट्रीयीकृत बँकांची ७८ हजार १२३ अशी एकूण ७९ हजार ८५५ कर्जखाती आहेत.
पहिल्या यादीत दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या कर्जखात्यांचा समावेश आहे. दरम्यान, पहिल्या यादीतील ४१ हजार ३१८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांतही लवकरच रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.
ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप झालेले नाही, त्यांनी ते पूर्ण करून घ्यावे. तसेच ‘ॲग्रीस्टॅक’अंतर्गत ‘फार्मर आयडी’ संबंधित तहसील कार्यालयातून काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) विकास जगदाळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.