जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरव्दारे पाणीपुरवठा

जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरव्दारे पाणीपुरवठा
Published on

जिंतूर तालुक्यातील ३ गावांना
५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

परभणी जिल्ह्यातील १४ गावांमध्ये पाणी टंचाई, १५ विहिरी,बोअरचे अधिग्रहण

ॲग्रोवन वृत्तसेवा
परभणी ः उन्हाचा चटका वाढला आहे. जलस्रोत आटले आहेत. परिणामी परभणी जिल्ह्यातील १४ गावांमध्ये पाणी टंचाई उद्भवली आहे. सोमवार (ता. ११) पर्यंत जिंतूर तालुक्यातील शेवडी, वाघी धानोरा, कौसडी या ३ गावांना ५ टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठ्यासाठी पालम तालुक्यात ११ आणि जिंतूर तालुक्यात ३ मिळून १४ गावांतील १५ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सूत्रांनी दिली.

२०२५ मध्ये परभणी जिल्ह्यात मे ते ऑक्टोंबर सहा महिन्याच्या कालावधीत पूर्वी मोसमी तसेच मोसमी मिळून एकूण ११४७.५ मिलिमीटर पाऊस झाला. सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे विहिरी तसेच इतर जलस्रोतांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध होता. सिंचन तलाव, धरणे भरली होती. परंतु अनेक भागात जलसंधारणाची कामे शास्त्रोक्त पद्धतीने झाली नाहीत. परिणामी पावसाचे पाणी वाहून गेले. जिल्ह्यात विहिरी,बोअरची संख्या वाढली असून त्यातून बेसुमार उपसा केला जात आहे. यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून उन्हाचा चटके बसत आहेत. एप्रिल-मे महिन्यात उष्णतेची लाट जाणवत आहे. तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. बाष्पीभवन उपसा, गळती आदी कारणांनी अनेक लघु तलाव तलाव आटले आहे. अनेक ठिकाणच्या पाणीपुरवठा योजनांचे जलस्रोत कोरडे पडले आहेत. गावे, वाड्या,वस्त्या, तांड्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु केली आहे. जिंतूर तालुक्यातील शेवडी, वाघी धानोरा येथे प्रत्येकी १ तर कौसडी येथे ३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला असून टँकरच्या १० फेऱ्या मंजूर आहेत. या ३ गावातील १२ हजार ५६६ एवढी लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. टँकरसाठी ४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. टँकर व्यतिरिक्त पालम तालुक्यातील उमरा, खरब धानोरा, रामापूर, बनवस, सादगीरवाडी, कोनेरवाडी, सादलापूर, वाडी खुर्द, उमरा अंतर्गंत हनुमाननगर, कोनेरवाडी, गिरधरवाडी अंतर्गंत तावजी वाडी या गावातील प्रत्येकी १ नुसार ११ विहिरी, बोअरचे तसेच अधिग्रहण करण्यात आले असून त्याद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात, असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com