फुरसुंगी - पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीसाठी येणारा खर्च पालकांकडून घेण्याचा प्रकार उरुळी देवाचीमधील पालिकेच्या शाळेत उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शिक्षण विभागाची चांगलीच नाचक्की झाली आहे..येथील शाळा सध्या पालिकेकडे हस्तांतरित झाली आहे. येथील कारभार पालिकेच्या शिक्षण विभागाकडून पहिला जातो. या शाळेत पिण्याच्या पाण्याची वाहिनी नसल्याने पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.अपुऱ्या टँकर पुरवठ्यावर उपाय म्हणून येथील साठवणूक टाकीपासून शाळेतील टाकीपर्यंत वाहिनी करण्यासाठी शाळेतील प्रभारी मुख्याध्यपकांनी थेट प्रत्येक पालकांकडून शंबर रुपये जमा करण्याची युक्ती काढली. मात्र या प्रकारामुळे शिक्षण विभागाची चांगलीच नाचक्की झाली आहे..एकतर समाविष्ट गावात शिक्षक पुरवण्यास पालिका असमर्थ ठरत असताना आता मुलांना मूलभूत सुविधा देखील पुरवता येत नाहीत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेला विधार्थ्याना सुख सुविधा पुरवण्याइतपत देखील निधी मिळत नाही का? पालकांकडून पैसे गोळा करण्याची पालिकेवर वेळ आली आहे का? पालिकेच्या शाळेत मोफत शिक्षण मिळत असताना अश्याप्रकारे पैश्यासाठी पालकांना वेठीस धरले जाणे योग्य नाही..शिक्षण विभाग विधार्थ्यांवर खर्च करत आहे तर या पैशानी नक्की कोणाची तहान भागणार होती? असा प्रश्न निर्माण होत आहे.पालिकेच्या शाळेत मोफत शिक्षण मिळते म्हणून आम्ही प्रवेश घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी शंभर रुपये जमा करण्याचा संदेश शाळेतील व्हाट्सअप ग्रुपवर मिळाला. सर्वांचीच आर्थिक परिस्थिती सारखी नसते.हे शाळेने समजून घ्यायला हवे. आज शंभर रुपये मागीतले उद्या आणखी जास्त मागतील. असे झाल्यास गोरगरिबांच्या लेकरांनी कुठे शिक्षण घायचे, असे नाव न सांगण्याच्या अटीवर पालकाने सांगितले..नवनाथ तावरे (प्रभारी मुख्याध्यापक, उरुळी देवाची) - मुलांना पिण्याच्या पाण्याची सातत्याने अडचण होत आहे.पाण्याची समस्या वरिष्ठांकडे मांडली होती.परंतु यावर कोणताही मार्ग निघाला नाही.त्यामुळे यावर उपाय म्हणून पालकांच्याच संमतीने वाहिनीसाठी येणार खर्च गोळा करत होतो.यामागे मुलांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा हा प्रामाणिक हेतू होता.विजयकुमार थोरात (उपायुक्त शिक्षण विभाग महापालिका) - हा प्रकार चुकीचाच आहे.या प्रकारची सविस्तर माहिती घेऊन शहानिशा करण्यात येईल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.