Pune School Crisis : अपुऱ्या शिक्षकसंख्येमुळे पालिकेच्या शाळेला कुलूप
Teacher Shortage Pune : सिंहगड रस्त्यावरील जयप्रकाशनगर येथील महापालिकेच्या शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने पालकांनी शाळेला टाळे ठोकले."शिक्षक मिळाल्याशिवाय शाळा उघडू देणार नाही" असा ठाम निर्णय पालक व ग्रामस्थांनी घेतला आहे.
किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील जयप्रकाशनगर येथील महापालिकेच्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून, विद्यार्थ्यांची संख्या १२० इतकी आहे. ‘दोन शिक्षक-सात वर्ग’ असा अजब प्रकार मागील वर्षभर शाळेत चालू आहे.