खंडाळा - पारगाव येथे घरफोडी

खंडाळा - पारगाव येथे घरफोडी

Published on

पारगावमध्‍ये पुन्‍हा घरफोडी
खंडाळा, ता. २० : पारगाव (ता. खंडाळा) येथे राहत्या बंद घराचे कुलूप तोडून ३८ हजार ८६० रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. खंडाळा शहरालगतची ही एका आठवड्यातील दुसरी घरफोडीची घटना घडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. महादेव नगरातील सचिन माने यांच्या राहत्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून पत्र्याच्या पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून घेऊन गेले. त्‍यात २७ हजार ४०० रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी तर ११ हजार ४६० रुपये किंमतीचे दोन ग्रॅम वजनाचे कानातील बुगडी असा मुद्देमाल लंपास केला. सचिन माने यांनी फिर्याद दिली असून, चंद्रकांत धापते तपास करीत आहेत.

------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com