Pargaon News : पारगावमध्ये अग्नितांडव! इलेक्ट्रॉनिक गोडाऊनला भीषण आग; एक कोटीचे साहित्य खाक, रसाळ कुटुंबाचा १५ वर्षांचा संसार उघड्यावर

दौंड तालुक्यातील पारगाव येथे नवनाथ रसाळ यांच्या इलेक्ट्रॉनिक गोडाऊनला भीषण आग लागून सुमारे एक कोटी रुपयांचे साहित्य खाक झाले.
Massive Fire at Electrical Warehouse in Pargaon, Daund

पारगाव( ता. दौंड )येथे नवनाथ रसाळ यांच्या इलेक्ट्रिकल वस्तूच्या गोडाऊनला लागलेल्या आगीने भस्मसात झालेल्या वस्तू.

sakal

Updated on

प्रकाश शेलार

पारगाव : पारगाव (ता. दौंड) येथे नवनाथ रसाळ यांच्या राहत्या घराला जोडून असणाऱ्या गोडाऊनला आग लागल्याने एक कोटी रुपये किंमतीच्या इलेक्ट्रिकल दुकानातील जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले. सदर घटना बुधवार दि. २५ रोजी मध्यरात्री १२.०० वाजण्याच्या सुमारास घडली. गाढ झोपेत असलेले कुटुंब वेळीच जागे झाल्याने जीवित हानी टळली. आगीमध्ये रसाळ यांचा मुलगा आर्यन याला भाजल्याने किरकोळ दुखापत झाली. सदर आग शॉर्टसर्किटने लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला असता जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com