esakal | पारगाव : शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार

शेतकऱ्याचा मुलगा झाला तहसीलदार

sakal_logo
By
सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : जारकरवाडी ता. आंबेगाव येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील निलेश मारुती काकडे या तरुणाची तहसीलदारपदी निवड झाल्याने परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.

येथील मारुती काकडे व नंदा काकडे हे दाम्पत्य शेती बरोबर गावात हॉटेल व्यवसाय करत आहे या सर्वसामान्य कुटुंबातील निलेश हा २०१९ च्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्याची तहसीलदार पदी निवड झाली आहे त्याचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण गावातच झाले त्यांतर त्याने संगणक अभियंताची पदवी संपादन केल्यानतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली या परीक्षेच्या माध्यमातून तो मंत्रालयात गृहनिर्माण विभागात दोन वर्षापासून सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असतानाच त्याने २०१९ च्या राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली त्यामध्ये तो उत्तीर्ण झाल्याने त्याची तहसीलदारपदासाठी निवड झाली आहे. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच रुपाली भोजणे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक रमेश लबडे, रामचंद्र ढोबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

loading image
go to top