

"पारगाव पोलिसांची तत्परता! मेंढपाळ महिलेचे हरवलेले सव्वातीन लाखांचे दागिने आणि रोख रक्कम ४८ तासांत शोधली; 'खाकी'च्या माणुसकीचे परिसरात कौतुक"
Sakal
पारगाव : काठापूर बुद्रुक ता. आंबेगाव येथे नदीच्या काठावर बकऱ्या चारत असताना संगीता अंजबापू तिखोळे या मेंढपाळ महिलेच्या कंबरेला खोचलेली दोन तोळे वजनाचे मंगळसुत्र व रोख ३८ हजार रुपये ठेवलेली कापडी पिशवी हरवली. पारगाव कारखाना पोलिसांनी तप्तरतेने तपास करून दोन दिवसाच्या आत त्या कापडी पिशवीचा शोध घेऊन एकूण सव्वातीन लाख रुपये ऐवजासह सदर कापडी पिशवी मेंढपाळ महिलेच्या स्वाधीन केल्याने पारगाव पोलिसांचे परिसरात कौतुक होत आहे.