

Midnight Robbery at Tukaidevi Temple in Pargaon
Sakal
प्रकाश शेलार
खुटबाव ( पुणे) : पारगाव येथील ग्रामदैवत तुकाईदेवी मंदिराच्या दोन दानपेट्या अज्ञात चोरट्याने फोडून रोख रक्कम लंपास केली. सदर घटना गुरुवार दिनांक ८ रोजी मध्यरात्री १२.३० ते १.०० च्या सुमारास घडली. घटना तुकाई देवस्थाने मंदिर परिसरामध्ये लावलेल्या सीसीटीवी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.