पारगाव : पारगाव ता. आंबेगाव येथील माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, गणेश भागवत व भरत ढोबळे या तीन तरुणांनी श्रीक्षेत्र पंढरपूर सायकलवारी करून निरोगी जीवनाचा संदेश दिला आहे. .बदलत्या जीवनशैलीमुळे नियमित व्यायाम करणे अनेकांना शक्य होत नसताना सायकल चालविणे हा उत्तम आणि सर्वांगिण व्यायाम असल्याचे सांगत या तीन तरुणांनी मागील तीन वर्षापासुन श्रीक्षेत्र पंढरपूर सायकलवारी हि प्रेरणादायी मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी (दि. २४) पहाटे पारगाव येथील सर्व ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन विठ्ठल ढोबळे यांनी गणेश भागवत, भरत ढोबळे आणि अशोक ढोबळे या सहकाऱ्यांसह पंढरपूर सायकलवारीला सुरुवात केली..श्रीक्षेत्र आळंदी येथे जाऊन माऊलींचे दर्शन घेतले. त्यानंतर दिवे घाट, सासवड या पालखी मार्गाने ते श्रीक्षेत्र पंढरपूरकडे रवाना झाले. यापूर्वीही विठ्ठल ढोबळे यांनी दोन वेळा पंढरपूर आणि एकदा श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सायकलने प्रवास करून आपली जिद्द आणि चिकाटी दाखवून दिली आहे.काल रविवारी सकाळी पंढरपूर येथे दर्शन घेऊन आज सोमवारी सकाळी श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे हे तिन्ही तरुणांची सायकलवारी पोहचली. या तीन दिवसात त्यांनी सायकलवरून एकूण सुमारे ५५० किलोमीटर चे अंतर पार केले आहे..विठ्ठल ढोबळे म्हणाले सायकल चालविल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि आरोग्य चांगले राहते, असा त्यांचा अनुभव असल्याचे सांगितले. या सायकलवारीसाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे तसेच उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.