Pune News : बैलाच्या निधनानंतर दशक्रीया विधीला प्रवचनांबरोबर स्मरणार्थ केले वृक्षारोपण

बाळासाहेब सिताराम पडवळ यांच्या गोठ्यातील शर्यतीच्या विज्या नावाच्या बैलाचे नुकतेच लम्पी आजाराने निधन झाले.
Tree Plantation
Tree PlantationSakal
Summary

बाळासाहेब सिताराम पडवळ यांच्या गोठ्यातील शर्यतीच्या विज्या नावाच्या बैलाचे नुकतेच लम्पी आजाराने निधन झाले.

पारगाव - पोंदेवाडी, ता. आंबेगाव येथील रोडेवाडी फाट्यावरील पडवळ वस्तीवर बाळासाहेब सिताराम पडवळ यांच्या गोठ्यातील शर्यतीच्या विज्या नावाच्या बैलाचे नुकतेच लम्पी आजाराने निधन झाल्यानंतर पडवळ कुटुंबाने घरातील व्यक्तीप्रमाणे बैलाची विधिवत दशक्रिया करून बैलाच्या स्मरणार्थ आंब्याचे झाडाचे वृक्षारोपण करून अखेरचा भावपूर्ण निरोप दिला.

बाळासाहेब सिताराम पडवळ यांनी एक वर्षाचा गोऱ्हा असताना बाजारातून खरेदी केला त्याचे विज्या म्हणून नामकरण केले. गेली 10 वर्षै विज्या आसपासच्या तालुक्यातील बैलगाडा शर्यती मधुन फळीफोडचा मान मिळवत त्याने पडवळ कुटुंबाचा नावलौकिक वाढवला. अनेक यात्रेच्या शर्यतीमध्ये विज्या ने घाटाचा राजा म्हणून किताब मिळवला होता. विज्याला काही दिवसापूर्वी ल़म्पी या आजाराने ग्रासले त्यातच त्याचे निधन झाले. पडवळ कुटुंबाने त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ केला होता. निधनानंतर त्याचे विधिवत दफन करून दहाव्या दिवशी विधीवत‌ पद्धतीने बैलाचा दशक्रिया विधी संपन्न झाला. यावेळी संतोष महाराज बढेकर यांनी प्रवचनाच्या माध्यमातून माणूस आणि मुक्या प्राण्याचे नाते विषद केले.

यावेळी बैलाच्या स्मरणार्थ दफन करण्यात आलेल्या ठिकाणी बैलाच्या स्मरणार्थ आंब्याचे झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निवेदक निलेश पडवळ, दत्ता महाराज मखर, सुशांत महाराज रोडे, मार्तंड टाव्हरे, सोमनाथ पोंदे यांनी श्रद्धांजली पर भावना व्यक्त केल्या. सहकारी सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल मखर, उपाध्यक्ष सदाशिव पडवळ,पोपट रोडे , माजी उपसरपंच संदीप पोखरकर , विठ्ठलराव पडवळ ,संजय बोंबे. नवनाथ पोखरकर,रमेश मखर, विकास पडवळ, लक्ष्मण पडवळ, रामदास मखर, नवनाथ मखर, सतीश घोलप, सुरेश घोलप, पोंदेवाडी रोडेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित सर्वाना अन्नदानाचा कार्यक्रमही आयोजित केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com