उरसानिमित्त परिंचेमध्ये संदल मिरवणूक

उरसानिमित्त परिंचेमध्ये संदल मिरवणूक

Published on

परिंचे, ता. २५ : परिंचे (ता.पुरंदर) येथील पीर अबंशाहवली बाबांचा उरुस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त गावातून संदल मिरवणूक काढण्यात आली होती. हा उरुस हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजला जात असून उरसानिमित्त दर्गा आणि परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जमातूल मुस्लिम देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले होते. फकीरभाई ताशेवाले यांच्या ढोलताशा पथकाने मिरवणुकीत रंगत आणली.
सोमवारी (ता. २३ ) पहाटे पाच वाजता नमाजपठण करण्यात आले. सकाळी आठ वाजता बाबांची पाकळणी करून दर्गा दर्शनासाठी बंद करण्यात आला. सकाळी दहा वाजता दर्ग्याचा मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. रात्री आठ वाजता गावातून वाजत गाजत संदल मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविक मिरवणूक पहाण्यासाठी उपस्थित होते. रात्री नऊ वाजता जाधव वाड्यातील आडामध्ये (विहिरीत) असलेल्या हुसेन शहा बाबांचे दर्शन घेऊन चादर चढवण्यात आली. गावचे पाटील विक्रमसिंह हिंमतराव जाधव यांच्या वाड्यात मिरवणूक जाऊन पाटलांच्या हस्ते संदल अर्पण करण्यात आला. परतीच्या प्रवासात शादावल बाबांना चादर चढवून मिरवणूक अबंशावली दर्ग्याकडे मार्गस्थ झाली.
रात्री दहा वाजता अबंशाहवली बाबांच्या मजारीला चंदनलेपाची चादर चढवून शेरा बांधण्यात आला. यावेळी भाविकांना मिठाईचे वाटप करण्यात आले. मंगळवारी (ता. २४) उरसाच्या मुख्य दिवशी पुणे, मुंबई, सातारा येथून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. बुधवारी (ता. २५) जीआरत साजरी करून मजारीवर फुले वाहून शेरा चढवण्यात आला. यावेळी वेगवेगळ्या फळांचे वाटप करून उत्सवाची सांगता करण्यात आली.
उत्सव पार पाडण्यासाठी आझाद इनामदार, अब्दुल इनामदार, कादर इनामदार, नासिर इनामदार, जैनुद्दीन इनामदार, रमजान इनामदार, बंडा इनामदार, मगबूल शेख, जावेद शेख, इक्बाल इनामदार,
शकील इनामदार, रज्जाक इनामदार, आसिफ इनामदार, हसरत इनामदार, निसार इनामदार, इरशाद इनामदार, तय्यब इनामदार, इरफान इनामदार, रफीक इनामदार यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com