पारनेर -महाविद्यालय पुरस्कार

पारनेर -महाविद्यालय पुरस्कार
Published on

जाहिरातदार असल्याने गरजेची

SPU26B05788
पारनेर ः महाविद्यालयाची सुसज्य इमारत.


पारनेर महाविद्यालयास प्लॅटिनम सस्टेनेबल कॅम्पस पुरस्कार
​पारनेर, ता. १८ : पर्यावरण संवर्धन आणि हरित कॅम्पस निर्मितीच्या ध्यासातून शाश्‍वात विकासाचे मॉडेल उभे करणाऱ्या पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाने राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश प्राप्त केले.
भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालय आणि रिसर्च हाईट फाउंडेशन यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या भारत सस्टेनेबिलिटी कॅम्पस मिशन अंतर्गत महाविद्यालयाला अत्यंत प्रतिष्ठेचा ‘प्लॅटिनम सस्टेनेबल कॅम्पस’ पुरस्कार नुकताच जाहीर झाला. देशभरातून १२ हजार महाविद्यालयांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला होता. जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, डॉ. दत्तात्रय घुंगार्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पसमध्ये पर्यावरण संवर्धनाचे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. १ जून रोजी हैदराबाद येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव ॲड. विश्‍वासराव आठरे, सहसचिव मुकेश मुळे, ॲड. दीपलक्ष्मी म्हसे, विश्‍वस्त माजी आमदार नंदकुमार झावरे, जी. डी. खानदेशे, सीताराम खिलारी, जयंत वाघ, डॉ. चंद्रकांत मोरे, डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी अभिनंदन केले.
----------​
यश केवळ एका व्यक्तीचे नसून संपूर्ण महाविद्यालयीन परिवाराचे आहे. राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमाचे फळ आहे.
-डॉ. रंगनाथ आहेर, प्राचार्य.
------------
‘प्लॅटिनम सस्टेनेबल कॅम्पस’ पुरस्कार हा आमच्या संस्थेसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाच्या सर्व घटकांनी व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळेच ऐतिहासिक यश मिळाले.
-रामचंद्र दरे, अध्यक्ष, मराठा विद्या प्रसारक समाज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com