पारनेर - हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर

पारनेर - हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर
Published on

टुडे एकसाठी
पारनेरमधील टोळी जिल्ह्यातून हद्दपार
पारनेर, ता. २७ : पारनेर व अहिल्यानगर तालुक्यांत गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीच्या प्रमुखासह दोघांना अहिल्यानगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
सुपे पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी या टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्यानुसार टोळीप्रमुख अतुल विश्वनाथ शिंदे (रा. शहाजापूर, ता. पारनेर), सदस्य अरुण शिवाजी गवळी आणि अनिकेत शशिकांत गवळी या तिघांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
या टोळीविरुद्ध अहिल्यानगर तालुका व सुपे पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी, रस्त्यात अडवून मारहाण, नुकसान करणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आरोपांची सखोल चौकशी करून जिल्हा प्रशासनाने हद्दपारीचा आदेश मंजूर केला आहे.

चौकट -
येणाऱ्या काळात संघटितपणे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी शरीराविरुद्ध, मालाविरुद्ध, गोवंशीय कायदा, भारतीय हत्यार कायदा, तसेच वाळूचोरीचे गुन्हे करणाऱ्या सराईतांची माहिती संकलित करून आणखी टोळ्यांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे.
- ज्योती गडकरी, पोलिस निरीक्षक, सुपे पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com