HSC Exam
sakal
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेतील अर्थशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर १७ फेब्रुवारीला द्वितीय सत्रात दुपारी तीन ते सायंकाळी सहा यावेळेत होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.