
ज्या मालकांनी आपले भूखंड उद्योग संचालनालयाची परवानगी न घेता परस्पर भाडेकराराने दिले आहेत. त्यास उद्योग संचालनालयाची परवानगी नाही, असे या नोटिशीत म्हटले आहे.
पुणे - उद्योग संचालनायलयाची परवानगी घेता परस्पर भूखंड भाडेकराराने दिलेल्या प्रकरणाची दखल अखेर पर्वती औद्योगिक को-ऑपरेटीव्ह सोसायटीने दखल घेतली आहे. या प्रकरणी परवानगी न घेता भूखंड भाडेकराराने दिला असल्यास उद्योग संचालनायालयची मान्यता नाही, अशी नोटीस सर्व भूखंड मालकांना दिली आहे. यावरून सोसायटीने दखल घेतली असली तरी या प्रकरणात उद्योग संचालनालयांची भूमिका मात्र अद्याप ‘थंड’ असल्याचे समोर आले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पर्वती येथील औद्योगिक वसाहतीमध्ये नियमांना फाटा देऊन परस्पर भूखंड भाडेकराराने दिले असल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे, तर काही भूखंड मालकांनी ज्या उद्देशासाठी भूखंड घेतला आहे. त्या भूखंडावर अटी-शर्तींचा भंग करून दुसऱ्याच गोष्टींसाठी वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. तसेच हस्तांतरण शुल्क न भरता परस्पर भूखंडांची विक्री केली असल्याची काही उदाहरणे समोर आली आहे. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम सकाळने दिले होते. त्याची दखल घेऊन सोसायटीने याबाबत भूखंड मालकांना नोटीस बजाविण्यास सुरुवात केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
अद्याप कोणतीही कार्यवाही नाही
ज्या मालकांनी आपले भूखंड उद्योग संचालनालयाची परवानगी न घेता परस्पर भाडेकराराने दिले आहेत. त्यास उद्योग संचालनालयाची परवानगी नाही, असे या नोटिशीत म्हटले आहे. एकीकडे भूखंड मालकांची असलेल्या या सोसायटीने त्यांची दखल घेऊन पावले उचालण्यास सुरुवात केली आहे. असे असताना मात्र उद्योग संचालनालयाकडून मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.