esakal | पर्वती पायथा परिसरात अल्‍पवयीन मुलाचा खुन
sakal

बोलून बातमी शोधा

पर्वती पायथा परिसरात अल्‍पवयीन मुलाचा खुन

पर्वती पायथा परिसरात अल्‍पवयीन मुलाचा खुन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जनता वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री 9 वाजता पर्वती पायथा परिसरात घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींच्या विरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौरभ तानाजी वाघमारे (वय 19, रा. जनता वसाहत) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, रविवारी रात्री नऊ वाजता पर्वती पायथा परिसरात 7 ते 8 जणाच्या टोळक्याने सौरभ याला पकडले. त्यानंतर त्याच्यावर धारदार हत्याराने सपासप वार करून खुन केला.

या घटनेनंतर टोळक्यानं घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पाहणी करून आरोपींचा शोध सुरु केला आहे. दरम्यान मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. सौरभ वाघमारे या तरुणाच्या खुनामागील नेमकं कारण अद्याप समजू शकले नाही.

loading image