पुण्यातील पश्चिम हवेलीत कोरोनाचा उद्रेक; कोविड सेंटर न सुरु झाल्याने रुग्णांचे हाल

corona pune
corona pune
Updated on

किरकटवाडी: सुरुवातीपासूनच कोरोनाचा हॉट स्पॉट ठरलेल्या पुण्याच्या पश्चिम हवेली तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक होताना दिसत आहे. पश्चिम हवेलीतील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील आतापर्यंतचा एकूण रुग्णसंख्येचा आकडा तब्बल 5476 वर पोहोचला असून सध्या 304 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत तर 99 रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. 5073 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. पश्चिम हवेली तालुक्यात खडकवासला, खानापूर, सांगरुण व खेड-शिवापुर ही चार प्राथमिक आरोग्य केंद्रे येतात. मागील काही काळात आटोक्यात आलेली रुग्ण संख्या या चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील गावांमध्ये पुन्हा एकदा झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. यापैकी खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील नऱ्हे, नांदेड, किरकटवाडी व खडकवासला या चार गावांमध्ये रुग्णसंख्या वाढीचा वेग जास्त असल्याने प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. 

प्राथमिक आरोग्य केंद्रानुसार आकडेवारी...
खडकवासला

  • एकूण रुग्ण संख्या-3,948
  • ऍक्टिव्ह- 234
  • बरे झालेले- 3,656
  • मृत्यू-58

खानापूर

  • एकूण रुग्णसंख्या-353
  • ऍक्टिव्ह- 18
  • बरे झालेले-318
  • मृत्यू-17

सांगरूण

  • एकूण रुग्णसंख्या-517
  • ऍक्टिव्ह-29
  • बरे झालेले-487
  • मृत्यू-1

खेड शिवापूर

  • एकूण रुग्णसंख्या-658
  • ऍक्टिव्ह-23
  • बरे झालेले-612
  • मृत्यू-23

सद्यस्थितीत झालेले लसीकरण

  • खडकवासला-5,500
  • खानापूर-1087
  • सांगरुण-970
  • खेड शिवापूर-1772
  • एकूण-9,329

कोविड केअर सेंटर अद्यापही सुरू न झाल्याने रुग्णांचे हाल.... एकीकडे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना नऱ्हे येथील कोवि केअर सेंटर अद्यापही सुरू न झाल्याने उपचार घेण्यासाठी रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही रुग्णांना घरीच थांबावे लागत आहे. बेड उपलब्ध झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून संबंधित रुग्णाशी संपर्क केला जातो व त्यानंतर रुग्णाला उपचारांसाठी नेण्यात येते. त्यामुळे नऱ्हे येथील कोविड केअर सेंटर तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. " नागरिकांनी मास्क वापरावा, गर्दी टाळावी, लक्षणे जाणवल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व तपासणी करून घ्यावी, 45 पेक्षा जास्त वय असलेल्या व मधुमेह,उच्च रक्तदाब व इतर गंभीर आजार असलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे", असे आवाहन खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ वंदना गवळी, खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ अश्विनी पाटील, सांगरुण प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ अनिल जोशी व खेड शिवापुर प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ प्रविण शिंदे यांच्याकडून करण्यात आले आहे.

"शहराला लागून असलेल्या गावांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे.रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. हवेलीचे प्रांताधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना नऱ्हे येथील कोविड केअर सेंटर तातडीने सुरू करण्याबाबत सुचित करण्यात आलेले आहे.एक-दोन दिवसांतच कोविड केअर सेंटर सुरू होईल."

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com