
पाषाण : पाषाण-सूस रस्त्यावर नागरिकांसाठी बांधलेले पदपथ व्यवसायिकांच्या अतिक्रमणांमुळे पूर्णपणे अडवले गेले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना हमरस्त्यावरून जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने यावर योग्य त्या उपायांची अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरत आहे.