मंगळवेढा बस स्थानकात ग्राहक पंचायततर्फे ‘प्रवासी दिन’ साजरा

मंगळवेढा बस स्थानकात ग्राहक पंचायततर्फे ‘प्रवासी दिन’ साजरा

Published on

MGV26B15192
मंगळवेढा : बस स्थानकात ग्राहक पंचायतीतर्फे प्रवासी दिन साजरा करताना उपस्थित एसटी अधिकारी, पदाधिकारी व प्रवासी.

मंगळवेढा बस स्थानकात प्रवासी दिन साजरा

मंगळवेढा : येथील बस स्थानकात तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीने प्रवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रवाशांचे हक्क, सुरक्षित व दर्जेदार सेवा याबाबत जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमास स्थानक प्रमुख शरद वाघमारे, ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष दत्तात्रय कोरे, सचिव डॉ. शरण बिराजदार, ग्रामपंचायत सदस्य भारत गवळी, वाहतूक निरीक्षक योगेश गवळी, वाहतूक नियंत्रक संतोष चव्हाण, वाहतूक नियंत्रक अनिल पाटील आदी उपस्थित होते. प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व सन्मानजनक प्रवास मिळावा यासाठी ग्राहक पंचायत सातत्याने प्रयत्नशील राहील, असे मत तालुका ग्राहक पंचायत सचिव शरण बिराजदार यांनी व्यक्त केले. यावेळी प्रवाशांशी संवाद साधत त्यांना मिळणाऱ्या सुविधा, तक्रार निवारण व्यवस्था तसेच सुरक्षित प्रवासाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. एसटी प्रशासन व ग्राहक पंचायत यांच्या समन्वयातून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविले जातील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com