बसमधील चाळीस प्रवासी अन् 'तो' दुचाकीस्वार...

मिलिंद संगई, बारामती
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

या बसला दुर्घटना झाली असती तर अनेक प्रवाशांचे प्राण धोक्यात आले असते. या प्रसंगानंतर एसटीतील प्रवाशांनी बसचालक गिरी यांचे कौतुक करत आभार मानले.

बारामती : वेळ आली होती पण काळ आला नव्हता या म्हणीचा प्रत्यय पंढरपूर बारामती या बसमधील प्रवाशांना आज आला. पंढरपूरहून सकाळी इंदापूर आगाराची बस (एमएच 13 सीयू 7246) निघाली. काही वेळातच बोंडले या गावानजिक अचानकच एक दुचाकीस्वार एसटीला आडवा आला. या दुचाकीस्वाराचा जिव वाचविण्याच्या उद्देशाने चालक संदीप संतराम गिरी यांनी गाडी वेगाने वळविली. मात्र त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ही गाडी शेजारी असलेल्या खांबाला धडकली. मात्र गिरी यांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील चाळीस प्रवासी तर सुखरुप राहिलेच शिवाय संबंधित मोटारसायकल स्वारही बचावला. त्यांच्या या प्रसंगावधनाचे प्रवाशांनी तोंड भरुन कौतुक केले.

हे पण वाचा - आता कोरोना व्हायरसला घाबरायची गरज नाही; हे वाचा! 

या बसला दुर्घटना झाली असती तर अनेक प्रवाशांचे प्राण धोक्यात आले असते. या प्रसंगानंतर एसटीतील प्रवाशांनी बसचालक गिरी यांचे कौतुक करत आभार मानले. तसेच प्रवासी प्रतिनिधी म्हणून सचिन गोरवे यांनी चालक संदीप गिरी व वाहक मनिषा सुर्वे यांचा शाल, श्रीफल, पुष्पहार देऊन बारामती बसस्थानकावर सत्कार केला. या वेळी बारामती स्थानकप्रमुख बी. नागापूरे, बारामती आगारातील कर्मचारी, प्रवासी व नागरिक उपस्थित होते.
 

हे पण वाचा - आता कोरोना व्हायरसला घाबरायची गरज नाही; हे वाचा! 

दुचाकीस्वाराला दिला चोप...
या प्रकरणी एसटीला आडव्या आलेल्या दुचाकीस्वाराला बसमधील काही प्रवाशांनी संतप्त होत चोप दिला. या दुचाकीस्वारामुळे बसमधील अनेकांचे प्राण धोक्यात आले असते, या विचाराने अनेकांचा थरकाप उडाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passenger life saved by driver's courage