- सुनील जगताप
थेऊर - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पीएमटी घेऊन जात असताना स्टेअरिंगसमोर मोबाईल ठेवून बस चालविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार लोणी स्टेशन ते शेवाळवाडी दरम्यान रविवारी (ता. २४) सायंकाळी पांच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. यामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील दौंड व हवेली तालुक्यातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.