दोन विमानांतील प्रवाशांच्या बॅगा एकाच बेल्टवर आल्याने प्रवाशांचा गोंधळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

plane

एकाच वेळी दोन विमानांतील प्रवाशांच्या बॅगा एकाच बेल्टवर आल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला.

दोन विमानांतील प्रवाशांच्या बॅगा एकाच बेल्टवर आल्याने प्रवाशांचा गोंधळ

- प्रसाद कानडे

पुणे - दिल्लीहून पुण्याला येणारे विमान (Plane) आधीच एक तास लेट. पुणे विमानतळावर (Pune Airport) उतरल्यावरदेखील पुन्हा उशीर. बेल्टची (Belt) संख्या मर्यादित. एकाच वेळी दोन विमानांतील प्रवाशांच्या बॅगा (Bag) एकाच बेल्टवर आल्याने प्रवाशांचा (Passenger) गोंधळ उडाला. प्रवाशांना आपल्या बॅगा घेण्यासाठी जवळपास ४० ते ४५ मिनिटांचा वेळ लागला. अशी परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून पुणे विमानतळांवर निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवासी वैतागले आहेत.

प्रवास गतिमान व्हावा, वेळेची बचत व्हावी या करिता अनेक प्रवासी हजारो रुपये खर्चून विमानांनी प्रवास करतात. मात्र, त्याची फलश्रुती देखील उशिर होण्यानेच होते. शनिवारी दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानास एक तासाचा उशीर झाला. त्यामुळे त्या विमानाला पुण्याला येण्यास तासाचा उशीर झाला. विमानतळावर उतरल्यावर प्रवाशांना बॅग घेण्यास चाळीस मिनिटे लागले. बॅग घेण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती. प्रवाशांना एकमेकांना धक्के लागत होते. अशा स्थितीत बॅगा घेऊन प्रवाशांना आपले घर गाठावे लागले. त्यामुळे हे विमानतळ आहे कि एसटी स्टॅन्ड अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली. अनेकदा विमानांना उशिर होतो, तर काही रद्द होतात, त्यामुळे प्रवाशांना अशा समस्यांना तोंड द्यावे लागते.

तुमचे अनुभव कळवा

पुणे विमानतळावरून प्रवास करताना कोणकोणत्या अडचणी येतात, त्या आमच्यासोबत आपल्या नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर शेअर करा.

विमानाच्या उशिरास विमानतळ प्रशासन जबाबदार नाही. शनिवारी दिल्लीहून विमान उशिरा आले. त्याचवेळी दुसऱ्या शहरातूनदेखील विमान दाखल झाले. प्रवाशांना बॅग लवकर मिळावी यासाठी आम्ही अन्य बेल्टवर बॅग घेतल्या. तक्रार करणाऱ्या प्रवाशांनी प्रशासनाचे कामकाज समजून घेणे गरजेचे आहे.

- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे (लोहगाव) विमानतळ

पुणे विमानतळावर नियोजनचा अभाव आहे. बॅग घेण्यासाठीच जर ३० ते ४० मिनिटे लागत असतील तर अन्य सुविधांबाबत न बोललेच बरे. अन्य बेल्ट रिकामे असताना एकाच बेल्टवर अधिक लगेज, बॅग आल्याने हा गोंधळ उडाला. प्रशासनाने नेटके नियोजन करावे.

- गौरी पौखरियाल, तक्रारदार प्रवासी

काय सांगतो मायनस ५, मायनस ७ चा नियम?

मायनस ५ व मायनस ७ च्या नियमानुसार विमान विमानतळावर उतरल्यानंतर त्याच्या चाकाला चॉक्सऑन करावे लागते. चॉक्सऑन केल्यावर पाच मिनिटांच्या आतच त्या संबंधित विमानातील प्रवाशाची बॅग बेल्टवर पोचली पाहिजे. त्यासाठी ट्रॅक्टरने ट्रॉलीतून लवकरात लवकर बॅग, लगेज उतरवून बेल्टवर आणणे गरजेचे आहे. ही जबाबदारी संबंधित विमानसेवा देणाऱ्या कंपनीची आहे. या नियमांचे पालन होत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी विमानतळ प्रशासनाची आहे.

बेल्ट पाच अन् प्रवासी १७ हजार

पुणे विमानतळावर येणाऱ्या विमानांसाठी पाच बेल्ट आहेत. दिवभरात सुमारे १६ ते १७ हजार प्रवासी पुणे विमानतळावर दाखल होतात. त्या सर्वांचे बॅग, लगेज हे बेल्टवर येतात. मग तिथूनच प्रवाशांना घ्यावे लागते. मात्र, ही प्रक्रिया वेळेत पार पडणे गरजेचे आहे. याला जर वेळ लागत असेल तर प्रशासनाचे नियोजन चुकत असल्याचे स्पष्ट आहे.

पुणे विमानतळ

  • रोजच्या विमांनाची संख्या : ८०

  • प्रवासी संख्या : ३२ हजार

  • आंतरराष्ट्रीय उड्डाण : दुबई

  • सर्वाधिक उड्डाण दिल्लीसाठी : २४

Web Title: Passengers Confusion As The Passenger Bags Of The Two Planes Came On The Same Belt

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Passengerplanebags
go to top