

Pune chain snatching
sakal
पुणे - उन्हाळी सुट्यांमुळे स्वारगेट एसटी स्थानकावर होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांत महिलांचे एक लाख ६९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, स्थानक परिसरातील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.