एनडीएच्या १३५व्या तुकडीतून २६१ विद्यार्थी देशसेवेसाठी सज्ज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पुणे - पहाटेच्या गार वाऱ्यात पसरलेल्या निःशब्द शांततेत ‘हम एनडीए के कॅडेट हैं’ ही सुरावट बॅंडवर सुरू झाली आणि शिस्तबद्ध संचलन करत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) १३५वी तुकडी खेत्रपाल संचलन मैदानावर दाखल झाली. ‘सारे जहाँ से अच्छा’, ‘देशों का सरताज भारत’च्या तालावर लयबद्ध संचलन करीत विद्यार्थ्यांनी ‘अंतिम पग’ची पायरी ओलांडली आणि तीन वर्षांचे खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण झाले. उपस्थितांचा टाळ्यांचा कडकडाट होत असतानाच लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानवंदना देत एक-एक पाऊल पुढे टाकत मनोज पांडे ब्लॉकमध्ये पोचलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी एकच जल्लोष केला.

पुणे - पहाटेच्या गार वाऱ्यात पसरलेल्या निःशब्द शांततेत ‘हम एनडीए के कॅडेट हैं’ ही सुरावट बॅंडवर सुरू झाली आणि शिस्तबद्ध संचलन करत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) १३५वी तुकडी खेत्रपाल संचलन मैदानावर दाखल झाली. ‘सारे जहाँ से अच्छा’, ‘देशों का सरताज भारत’च्या तालावर लयबद्ध संचलन करीत विद्यार्थ्यांनी ‘अंतिम पग’ची पायरी ओलांडली आणि तीन वर्षांचे खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण झाले. उपस्थितांचा टाळ्यांचा कडकडाट होत असतानाच लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानवंदना देत एक-एक पाऊल पुढे टाकत मनोज पांडे ब्लॉकमध्ये पोचलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी एकच जल्लोष केला. निमित्त होते ते ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’च्या १३५व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाचे...

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत हे दीक्षांत संचलनाचे प्रमुख पाहुणे होते. सकाळच्या नीरव शांततेत जनरल रावत यांनी संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. जैप्रीत सिंग याला राष्ट्रपती सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. परिमार पारासर याला रौप्य आणि स्वप्नील गुप्ता याला ब्राँझ पदक देऊन गौरविण्यात आले. ‘सी’ स्क्वाडर्नला ‘द चिफ ऑफ स्टाफ बॅनर’ प्रदान करण्यात आला.

सुखोई आणि जग्वारची सलामी
भारतीय हवाई दलाची मदार असलेल्या सुखोई (सु ३० एमकेआय) या स्वनातील (सुपरसोनिक) वेगाने हवेत झेपावणाऱ्या लढाऊ विमानांनी ‘एनडीए’च्या सुदान ब्लॉकवरून भरारी घेत संचलनाला मानवंदना दिली. त्या आधी आलेल्या जग्वार विमानानेही उपस्थितांचे लक्ष वेधले.

Web Title: Passing Out Parade of 135th course of NDA today