पासपोर्टसाठी ‘चॅटबोल’

सलील उरुणकर 
शनिवार, 21 एप्रिल 2018

पुणे - पासपोर्टच्या अर्जात ‘स्पेलिंग मिस्टेक’ झाली तर काय करायचे? तत्काळ पासपोर्ट मिळविण्यासाठी काय करायचे? मुदतबाह्य पासपोर्ट ‘रिन्यू’ करण्यासाठी काय करावे लागते, अशा स्वरूपाचे अनेक प्रश्‍न तुमच्या मनात असतील... अशा वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नांना न थकता, न चिडता, शॉर्टकट न मारता उत्तरे देण्याचा निश्‍चय पासपोर्ट कार्यालयाने केला आहे. 

काळजी करू नका... त्यासाठी कोणताही अधिकारी, कर्मचारी २४ तास काम करणार नाहीये, तर ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून ‘चॅटबोल’ ही सेवा पासपोर्ट कार्यालयाकडून सुरू केली जाणार आहे. तुमच्यापैकी अनेकांनी ‘एआय’वर आधारित ‘चॅट बॉट्‌स’चा वापर केला असेल. रेस्टॉरंट, हॉटेल बुकिंग किंवा कार्यालयांतर्गत कामकाजासाठी चॅट बॉट्‌सचा वापर सध्या अनेक ठिकाणी केला जात आहे. मात्र सरकारी कार्यालयाकडून या तंत्रज्ञानाचा वापर नागरिकांच्या सोयीसाठी करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

‘चॅटबोल’ कसे काम करते 
तुम्ही ‘पासपोर्ट इंडिया’च्या संकेतस्थळाला भेट दिल्यावर तुमचे स्वागत करणारा एक मेसेज दिसतो. त्याला प्रतिसाद दिल्यानंतर तो पुढील प्रश्‍न विचारतो. तुमच्या मनातील कोणताही प्रश्‍न तेथे टाइप केल्यावर तंत्रज्ञानाच्या साह्याने त्याचे उत्तर दिले जाते. पूर्वी जसे ‘फ्रिक्वेन्टली आस्क्‍ड क्वेश्‍चन’ हे लिखित स्वरूपात असायचे तसे आता संवादात्मक स्वरूपात विचारले जातात. त्यामुळे कोणताही मजकूर वाचत न बसता, तुमच्या प्रश्‍नाचे थेट उत्तर तुम्हाला मिळू शकते. 

पासपोर्ट चॅटबोल सेवा
 प्रश्‍नोत्तराची भाषा - हिंदी 
 एकूण समाविष्ट प्रश्‍न - १०० 
 येथे विचारा प्रश्‍न - www.passportindia.gov.in 

13.45 लाख राज्यात जारी झालेले पासपोर्ट
1400 पुणे विभागाकडून रोज जारी होणारे पासपोर्ट

आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील तांत्रिक तज्ज्ञांसोबत आज (शुक्रवारी) बैठक झाली आहे. ही सेवा लवकर सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. सुरवातीला शंभर प्रश्‍नांचा समावेश चॅटबोल सेवेत करण्यात येईल. 
- अनंतकुमार, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी

Web Title: passport chatbol