

पुणे, ता. २४ : नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी राबविलेल्या ‘पासपोर्ट सेवा कार्यक्रम २.०’मुळे या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांतच तब्बल दोन लाख १७ हजार पारपत्रांचे वितरण झाले आहे, अशी माहिती पुणे विभागाचे पारपत्र अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी बुधवारी दिली.
बाणेर येथील पारपत्र कार्यालयात ‘पारपत्र सेवा दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी उप पारपत्र अधिकारी श्रुती पांडे, जनसंपर्क अधिकारी जतीन पोटे उपस्थित होते. गायकवाड म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी पाच लाख आठ हजार अर्जांपैकी चार लाख ७२ हजार ९६६ पारपत्रे वितरित झाली. अपुऱ्या कागदपत्रांमुळे केवळ दोन टक्के अर्ज प्रलंबित राहिले. आता संपूर्ण प्रक्रिया डिजिटल झाली असून, मोबाईल ॲपद्वारे कागदपत्रे अपलोड करण्याची सोय उपलब्ध आहे.’’
नागरिकांना आता ‘यूपीआय’ आणि क्यूआर कोडद्वारे शुल्क भरता येते. सध्या चिप असलेली अत्याधुनिक बायोमेट्रिक पारपत्रे दिली जात असून, यामुळे इमिग्रेशन प्रक्रिया अधिक वेगवान झाली आहे. टपाल कार्यालय पासपोर्ट सेवा केंद्रांच्या प्रभावी कामगिरीमुळे वितरणाचा वेग वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.