वांगी येथील जिल्हा परिषद शाळेत "गुढीपाडवा पट वाढवा अभियान"

वांगी येथील जिल्हा परिषद शाळेत "गुढीपाडवा पट वाढवा अभियान"

Published on

‘पट वाढवा’ उपक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत
चिखलठाण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वांगी नं. २ येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘पट वाढवा’ उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गावातील माता-पालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाला नूतन पंचायत समिती सदस्या सोनाली नितीन तकिक प्रमुख उपस्थित होत्या. त्यांनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व वर्गांना भेट देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासली. विशेषतः इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गांची सखोल पाहणी करण्यात आली. वर्गशिक्षिका एम. डी. आदलिंगे व आय. एस. मुलानी यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. तसेच ‘सुंदर हस्ताक्षर’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या अक्षरात झालेली सुधारणा पाहून समाधान व्यक्त केले. शाळेतील विविध उपक्रमांचे त्यांनी अवलोकन केले. त्यांच्या सोबत आलेल्या पालकांनीही शैक्षणिक गुणवत्ता पाहून मराठी शाळेबद्दल समाधान व्यक्त केले. गुढीपाडवा ‘पट वाढवा’ उपक्रमांतर्गत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी सोनाली नितीन तकिक यांनी शालेय पोषण आहार व पूरक पोषण आहार योजनांची सविस्तर माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी समाधानकारक असल्याचे नमूद केले. शाळेच्या अडचणी सोडविण्यासाठी पंचायत समितीमार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com