

पाटणला रामापूर ते झेंडा चौक रस्ता पूर्णत्वाकडे
महिनाभरात कऱ्हाड- चिपळूण मार्गावरील वाहतूक होणार पूर्ववत; कोंडी मात्र कायम
पाटण, ता. १८ : येथून जाणाऱ्या पाटण ते कोयनानगर रस्त्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. अतिक्रमणे काढून शहरातील रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, तर झेंडा चौक ते रामापूर दरम्यानचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. महिनाभरात कऱ्हाड- चिपळूण मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्याची अपेक्षा असली, तरी सध्या मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक इतरत्र वळवल्याने कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
सध्या पाटण शहरातील रस्ता रुंदीकरण व धांडे पुलाचे काम सुरू आहे. नागरिकांनी अतिक्रमणे काढून प्रशासनाला सहकार्य केले आहे. मात्र, सध्या रस्त्यावर असणारे वीज वितरण कंपनीचे खांब हलवण्याचे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे सध्या रस्त्याच्या कामावर त्याचा परिणाम होत आहे. विजेच्या खांबांमुळे सध्या रस्त्याचे काम रखडले असून, वीज वितरण कंपनीने तातडीने विद्युत खांब हटवणे गरजेचे आहे. येत्या दोन महिन्यांत रस्त्याचे काम पूर्ण करावे, असा आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठकीत दिला होता. त्यानंतर महसूल प्रशासन आणि पोलिसांनी अतिक्रमण हटवून रस्त्याचे काम पुन्हा सुरू केले. सध्या हे काम प्रगतिपथावर असून, झेंडा चौक ते रामापूरपर्यंत एक बाजू पूर्ण झाली असून, दुसऱ्या बाजूचे काम विजेचे खांब हटवल्यानंतर हाती घेण्यात येणार असल्याचे कंपनीचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
.................................................
धांडे पुलावरील वाहतुकीला महिना
ठेकेदार कंपनीने रामापूर ते झेंडा चौक, तसेच धांडे पुलाचे निम्मे काम पूर्ण करून घेतले आहे; परंतु रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर किमान २० दिवस रस्त्यावरून वाहतूक करता येणार नसल्याचे ठेकेदार कंपनीकडून सांगण्यात आले आहे. २० दिवसांनंतर धांडे पुलावरूनही वाहतूक सुरू करण्यात येईल; परंतु अवजड वाहने महिनाभर या रस्त्यांवरून नेता येणार नाहीत.
.................................................
वाहतूक कोंडीचा सामना; प्रवासी हैराण
झेंडा चौक, कळके चाळमार्गे रामापूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढल्याने पाटणकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे, तर धांडे पुलाच्या कामामुळे सध्या पाटणचे बस स्थानक बाजार समिती या ठिकाणी हलवण्यात आले आहे. मात्र यामुळे प्रवासी मात्र हैराण झाल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी येण्यासाठी रिक्षा चालकांकडून मोठे भाडे आकारले जाते, तर अन्य पर्यायी वाहतूक नसल्याने अनेकांना चालतच जावे लागत आहे.
.....................................
फोटो :.......... PNE26W19975
पाटण : झेंडा चौक ते रामापूर दरम्यान झालेले काम.
फोटो :
PNE26W19975
----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.