esakal | पुण्यात रुग्णालयाच्या दारात सोडला प्राण
sakal

बोलून बातमी शोधा

hospital

बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रुग्णाला पूना हॉस्पिटलमध्ये आणले. त्यावेळी रुग्णाला धाप लागली होती. त्यांच्यावर तातडीने उपचार होणे आवश्‍यक होते.मात्र जागा नाही,असे  रुग्णालयातर्फे सांगण्यात येत होते.

पुण्यात रुग्णालयाच्या दारात सोडला प्राण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे -  प्लीज, पेशंटला अँडमिट करून घ्या, असे अक्षरशः काकुळतीला येऊन रुग्णालयातील डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना सांगितले. तुम्ही आता उपचार करा; नंतर त्यांना दुसरीकडे हलवू, असेही वारंवार सांगून पाहिले. पण "जागा नाही', हे एकच कारण प्रत्येक वेळी देत रुग्णास दाखल करून घेतले नाही. यामुळे अखेर रुग्णालयाच्या दारातच रुग्णाने प्राण सोडल्याचे या रुग्णाच्या मुलाने सांगितले. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुभाषचंद्र मुंदडा (वय 72) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. त्यांचा मुलगा आनंद मुंदडा म्हणाले, ""बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रुग्णाला पूना हॉस्पिटलमध्ये आणले. त्यावेळी रुग्णाला धाप लागली होती. त्यांच्यावर तातडीने उपचार होणे आवश्‍यक होते. मात्र जागा नाही, असे वारंवार रुग्णालयातर्फे सांगण्यात येत होते. तुम्ही रुग्णाला दाखल करून त्यांच्यावर उपचार करा, आपण नंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवू, असे संबंधितांना सांगण्यात आले. परंतु यात बराच वेळ गेला. जेव्हा दाखल केले, त्यावेळी रुग्णाच्या हृदयाची धडधड थांबली होती. रुग्णालयाने उपचारांसाठी रुग्णाला वेळेत दाखल करून घेतले नाही. ईमर्जन्सीमध्ये दोन बेड रिकाम्या होत्या. त्यानंतरही का रुग्णावर तातडीने उपचार का केले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अतिदक्षता विभागात जागा शिल्लक नव्हती 
रुग्णाला मधुमेह, मूत्रपिंड विकार, हृदयविकार होता. रुग्ण नुकताच कोरोनातून बरा झाला होता. रुग्णाला अतिदक्षता विभागात उपचाराची गरज होती. परंतु तेथे जागा नव्हती. अशा वेळी रुग्णाला आपत्कालीन वैद्यकीय विभागात दाखल केले. तोपर्यंत त्यांच्या हृदयाचे कार्य थांबले होते, असे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

loading image