esakal | बारामतीकरांच्या कोरोना लढाईला सॉफ्टवेअरचे बळ
sakal

बोलून बातमी शोधा

covid care.jpg

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्टर्लिंग सिस्टिम्स प्रा. लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पवार यांनी हे सॉफ्टवेअर विनामूल्य विकसित करुन दिले आहे.

बारामतीकरांच्या कोरोना लढाईला सॉफ्टवेअरचे बळ

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : कोरोनाशी दोन हात करणा-या आरोग्य यंत्रणेला दिलासा देणारे एक सॉफ्टवेअर आजपासून बारामतीत कार्यान्वित करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्टर्लिंग सिस्टिम्स प्रा. लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पवार यांनी हे सॉफ्टवेअर विनामूल्य विकसित करुन दिले आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आजपासून या प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला. या प्रणालीमध्ये रिपोर्टस तयार करणे, अहवाल सरकारला देणे, त्याची माहिती जतन करुन ठेवणे, गावनिहाय आकडेवारी उपलब्ध करुन देण्यासह सर्व प्रकारची माहिती एका क्लिकवर आरोग्य यंत्रणेकडे उपलब्ध असेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मार्चपासून कोरोनाचे संकट गडद झाले. सध्या कोरोना तपासणीसाठी कमालीचा ताण आरोग्य यंत्रणेवर येत आहे. ही बाब विचारात घेऊन तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी वेळेत प्रभावीपणे प्रत्येक रुग्णाची माहिती सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भरुन घेण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

-डॉ. मनोज खोमणे,  तालुका आरोग्य अधिकारी   

खालील बाबींचा समावेश
•    दिवसानिहाय व एकूण नोंदणी आकडेवारी
•    डॉक्टरांकडून झालेल्या एकूण तपासणीचा तपशिल
•    तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची व एकूण संख्या
•    पॉझिटीव्ह व निगेटीव्ह नमुन्यांची माहिती
•    तालुका व गावनिहाय तक्ता तसेच बदलता डॅशबोर्ड
•    विविध शासकीय नमुन्यात लागणारे रिपोर्टस. 

खालील प्रमाणे प्रक्रीया
•    रुग्ण नोंदणी व मेडीकल केस रेकॉर्ड
•    डॉक्टरांची तपासणी
•    आयसीएमआर स्पेसिमन रेफरल फॉर्म भरुन घेणे
•    कोरोना तपासणीचा रिपोर्ट नोंदविणे
•    रुग्णाच्या मोबाईलवर सदरचा रिपोर्ट पाठविणे. 

खालील चार केंद्र परस्परांशी संलग्न
•    रुई ग्रामीण रुग्णालय, 
•    सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालय
•    सकीय वैद्यकीय महाविद्यालय कोविड केअर सेंटर
•    बारामती हॉस्पिटल.