esakal | Mucormycosis : सरकारी यंत्रणेला लागली ‘बुरशी’
sakal

बोलून बातमी शोधा

injection

सरकारी यंत्रणेला लागली ‘बुरशी’; इंजेक्शनसाठी प्रतीक्षा संपेना

sakal_logo
By
योगिराज प्रभुणे - सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘पैसे भरल्याची पावती दाखवा मगच इंजेक्शन घेऊन जा, तेही गुरुवारी (ता. २७) सकाळी दहा वाजल्यानंतरच. आता कार्यालयाची वेळ संपली...’ औंध येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या या भूमिकेमुळे पुण्यातील म्युकरमायकोसिसच्या एकाही रुग्णाला जीवरक्षक इंजेक्शन मिळू शकले नाही.

म्युकरमायकोसिस या आजाराचे या आजाराचे सुमारे सहाशे रुग्ण जिल्ह्यात आहेत. ‘अँम्फोटेरेसिन बी’ हे एकमेव इंजेक्शन त्यावर प्रभावी ठरते. रुग्णशय्येवर असलेल्या या रुग्णांसाठी हे इंजेक्शन वेळेत मिळणे नितांत गरजेचे असते. हे वितरण व्यवस्थित व्हावे, त्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होऊन या उद्देशाने याचे वितरण थेट जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे रुग्णालयांना करण्यात येते. आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाने निश्चित केल्याप्रमाणे शहरातील वितरकांकडून या इंजेक्शनचा पुरवठा रात्री उशिरापर्यंत रुग्णालयांना होत असे. मात्र, आज शहरातील वितरकांकडून एकही वायल मिळाली नाही.

--------------------------------

बुलेट

दिवसभरातील घटनाक्रम

- औंध जिल्हा रुग्णालयात दोनशे इंजेक्शन्स असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाली

- संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या दोनशे इंजेक्शन्सचे ५६ रुग्णालयांमध्ये वितरण

- संध्याकाळपर्यंत या वितरणाची माहिती रुग्णालयांना मिळाली

- तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाची कामाची वेळ संपली होती

- संध्याकाळी साडेसात वाजल्यानंतर नातेवाइकांकडून इंजेक्शनसाठी रुग्णालयाकडे पाठपुरावा

- रुग्णालयांमधील औषध विभागातर्फे जिल्हा रुग्णालयाशी संपर्क

- उद्या (गुरुवारी) सकाळी दहा वाजल्यानंतर पैसे भरल्याची पावती घेऊन या आणि इंजेक्शन घेऊन जा, असे उत्तर

-------------------------------------

चौकट

रुग्ण बिचारा बघतो वाट...

या बाबत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाशी संपर्क साधला असता ‘जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पैसे भरल्यानंतरच इंजेक्शनचे वितरण होईल,’ असे उत्तर देण्यात आले. सरकारी अधिकारी त्यांच्या आदेशाचे पालन करत होते. खासगी रुग्णालय सरकारी यंत्रणेकडे पाठपुरावा करीत होती. या सर्व प्रक्रियेत प्रत्येक क्षणाला रुग्ण मात्र शरीरातील बुरशीशी लढण्यासाठी इंजेक्शनची वाट बघत होता. याची फिकीर या यंत्रणेला कुठंच दिसत नव्हती.