‘महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायत रुग्णांची हक्क जागृती करणार’

‘महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायत
रुग्णांची हक्क जागृती करणार’
Published on

वडगाव मावळ, ता. ८ : रुग्णालयांची मनमानी खपवून न घेता रुग्णांनी आपल्या हक्क सेवांबाबत जागृत रहावे यासाठी महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायत राज्यभरात रुग्णांच्या प्रमुख कायदेशीर हक्कांची जागृती करणार असल्याची माहिती ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. विजय लाड व राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी दिली.
लाड यांनी सांगितले की, वैद्यकीय क्षेत्रात रुग्ण हा केवळ एक रुग्ण नसून, तो सेवा घेणारा ग्राहक देखील आहे. आरोग्य मंत्रालयाची ‘रुग्ण हक्क सनद’ आणि ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अंतर्गत रुग्णांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. तरीही अनेक रुग्णालयांकडून सामान्य जनतेची लूट होत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर, ग्राहक पंचायत महाराष्ट्रतर्फे रुग्णांच्या प्रमुख कायदेशीर हक्कांची जनजागृती करणार आहे.

रुग्णांचे हक्क
- बिलाचा सविस्तर तपशील मिळविणे
- उपचारापूर्वी खर्चाचा अंदाज देणे
- बिलासाठी रुग्णाला डांबून ठेवणे बेकायदेशीर
- औषधांच्या किमतीवर नियंत्रण
- ७२ तासांत वैद्यकीय कागदपत्रे मिळवणे
- कॅशलेस विमा धारकांसाठी नियम निश्चित करणे

रुग्णांनी उपचारादरम्यान सजग राहणे गरजेचे आहे. कोणत्याही रुग्णालयाकडून हक्कांचे उल्लंघन होत असेल, तर घाबरून न जाता लेखी तक्रार नोंदवावी. ग्राहक पंचायत महाराष्ट्र अशा अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी सदैव तत्पर आहे.
- अरुण वाघमारे, सचिव, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com