पुण्यात याठिकाणी मिळतोय रुग्णांना दिलासा

हिंजवडी - कोरोना रुग्णांसाठी उभारलेले विलगीकरण कक्ष.
हिंजवडी - कोरोना रुग्णांसाठी उभारलेले विलगीकरण कक्ष.

पुण्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे सर्वच यंत्रणा कोलमडल्या. मग पुणेकरांचे काय होणार इतपत विचार केला जाऊ लागला अन जगाच्या नकाशावर पुणे ठळक झालं ते कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येने... याच काळामध्ये कोथरूडचे आमदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्या पद्धतीने सुसज्ज कोविड यंत्रणा उभी केली, त्यामुळे कोरोना रुग्णांना दिलासा मिळाला. मी हे खर सांगते. कारण, त्याचा अनुभव मी घेतीये म्हणूनच हे सगळं धाडसाने आणि प्रत्यक्ष घेतलेल्या अनुभवांच्या आधारे सांगत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मी आणि माझे कुटुंब कोरोनाबाधित असल्याचा रिपोर्ट हातात पडला. कुठे जायचं असा प्रश्न पडला. घरातल्यांची काळजी व सुरक्षेची उपाययोजना म्हणून आम्ही या ठिकाणी दाखल झालो. पण मनात एक भीती होती. काय असेल सरकारी यंत्रणा आणि राजकारण्यांनी केलेली उपाययोजना. ती खरंच भावेल का, ती खरंच दिलासा देणारी असेल का? पण, माझ्या सर्व प्रश्नांना इथल्या व्यवस्थेने छेद दिला. खरंतर व्यवस्थाच नव्हे तर इथे राबणाऱ्या कार्यकर्त्यांनीही माझ्या प्रश्नांना छेद दिला. चंद्रकांतदादांनी उभारलेल्या यंत्रणेप्रमाणे खरंतर इतर राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी पुढे येऊन नागरिकांसाठी उपाययोजना करायला हव्यात, असे मला वाटते. जेणेकरून कोरोनाच्या संकटात खचलेल्या अनेकांना असा सक्षम आधार मिळाला तर ते या आजारातून लवकर बाहेर पडण्यास मदत होईल.

अशी घेतली जाते काळजी 
हिंजवडी येथील विलगीकरण कक्षात कोणतीही समस्या आली तरी कार्यकर्ते तत्काळ मदतीसाठी धावून येतात. त्यामुळे रुग्णांना कोणतीही अडचण येत नाही. आपल्या कुटुंबातील सदस्य आजारी असल्यावर आपण ज्याप्रमाणे काळजी घेतो, त्याचप्रमाणे इथे सर्व कार्यकर्ते काळजी घेतात. 

इथे आहेत या सुविधा

  • बेडची व्यवस्था 
  • रुग्णांच्या मनोरंजनासाठी पुस्तक, न्यूजपेपर, टीव्ही, वायफाय 
  • वेळोवेळी औषधोपचार करणासाठी डॉक्‍टर, नर्स 
  • सकाळी व संध्याकाळी चहा, नाश्‍ता, जेवण 
  • रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी आयुर्वेदिक काढा अन्‌ हळदीचे दूध 

चंद्रकांतदादांनी जेव्हा कोविड केअर सेंटरची संकल्पना आम्हाला सांगितली, तेव्हापासून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सर्व व्यवस्था केली. आम्ही रोज इथे थांबून सर्व गोष्टींचा आढावा घेत असतो. रुग्णांची सेवा करण्याची दादांमुळे आम्हाला एक प्रकारे संधीच मिळाली आहे. 
- पुनीत जोशी, अध्यक्ष, भाजप कोथरूड विधानसभा मतदारसंघ 

आदरणीय चंद्रकांतदादांचे सेवाकार्य आम्हा सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे असून या कार्यात आमचाही वाटा असावा म्हणून आम्ही पदाधिकारी-कार्यकर्ते या केंद्रावर उत्साहाने काम करत आहोत. कोणतीही भीती न बाळगता आणि खबरदारी घेत सर्वजण कार्यरत आहोत. आमच्यासाठी हा अनुभव नवा तर आहेच; पण संवेदना आणखी जाग्या करणाराही आहे. 
- दुष्यंत मोहोळ, अध्यक्ष, भाजयुमो, कोथरूड विधानसभा 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com