
रुग्णाला दवाखान्यात ने-आण करण्यासाठी दिलेल्या कारचा नातेवाईकाने केला अपहार
लोणी काळभोर - गरज सरो, वैद्य मरो.. रुग्णाला दवाखान्यात ने-आण करण्यासाठी दिलेली कार नातेवाईकाने तब्बल ६ वर्ष पूर्ण झाली तरी मूळ मालकाला परत दिलीच नाही. हि घटना थेऊर (ता. हवेली) येथे सप्टेंबर २०१७ ते मे २०२२ पर्यंत घडली आहे.
याप्रकरणी डॉ. अस्लम गनीभाई सय्यद (वय-५०, रा- बस स्टप शेजारी, जय मल्हार हटेलचे समोर, थेऊर, ता- हवेली) यांनी जावेद सत्तार खान (वय- ३८, रा. जे एस पी एम कॉलेजजवळ, नालबंद मंजील. हांडेवाडी रोड, पुणे) याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अस्लम सय्यद हे एक डॉक्टर आहेत. त्यांचे थेऊर येथे सय्यद हस्पिटल नावाने दवाखाना आहे. त्यांनी खाजगी वापरासाठी २०१७ साली मर्सिडीस बेंझ कार (क्र. MH12 PF 0051) घेतली होती. कार घेण्यासाठी ६ लाख डाऊन पेमेंट स्वरुपात रोख भरलेले होते. तर उर्वरित ३० लाख रुपये एच डी एफ सी बँकेचे लोन केले होते.
सप्टेंबर २०१७ डॉ. सय्यद हस्पिटलमध्ये बसले असताना, सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या चुलत आत्याचा मुलगा जावेद खान तेथे आला. जावेदने घरातील पेशंटला वेळोवेळी उपचारकामी हस्पिटलमध्ये न्यावे लागत आहे. त्यामुळे तुमच्याकडील एक कार द्या मला. आणि माझे दवाखान्याचे काम झाले कि, तुमची कार माघारी आणून देतो, अशी बतावणी करून जावेदने डॉ. सय्यद यांच्याकडील मर्सिडीस बेंझ कार घेऊन गेला.
त्यानंतर डॉ. अस्लम सय्यद यांच्याकडे दुसरी कार असल्याने त्यांनी पुढील एक महिना कार जावेदला मागीतली नाही. त्यानंतर ऑक्टोंबर २०१७ रोजी सय्यद कुटूंबियांसमवेत फिरण्यासाठी बाहेर जाणार होते. तेव्हा त्यांनी जावेदला कार मागितली. परंतु, जावेदने हॉस्पिटलचे काम अद्याप चालु असुन तुम्हाला दोन ते तीन दिवसांनी कार आणुन देतो. असे जावेदने डॉ. अस्लम सय्यद यांना सांगितले.
दरम्यान, डॉ. अस्लम सय्यद यांनी दोन ते तीन दिवसांनी पुन्हा कार परत आणुन देण्यासाठी जावेदला फोन केला. तेव्हा जावेदने वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे दिली. आणि डॉ. सय्यद यांचे फोन उचलणे बंद केले. डॉ. अस्लम सय्यद यांनी एच डी एफ सी बँकेचे लोन फेडले आहे. तसेच कारची मुळ कागदपत्रे कारमध्येच आहेत. जावेद खान याने तब्बल ६ वर्ष कारचा परस्पर वापर करून तिचा अप्रामाणिपणे अपहार केला आहे. याप्रकरणी डॉ. अस्लम सय्यद यांनी जावेद खान याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
Web Title: Patients Hospital Up Down Car Relatives Abuse Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..