प्रजासत्ताक दिनावर आचारसंहितेचे सावट
KRK26B03748, KRK26B03749
मेंढापूर (ता.पंढरपूर) ः येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देशभक्तिपर गाण्यावरील लेझीम नृत्यातील प्रसंग. (दुसऱ्या छायाचित्रात) कृषक भारती कंपनीकडून शाळेस फिल्टर भेट देताना अधिकारी.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देशभक्तीपर गाण्यांवर कवायत
करकंब : येथील जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांमध्ये शासकीय आदेशानुसार देशभक्तिपर गाण्यांवर कवायत घेण्यात आल्यामुळे वातावरण भारून गेले होते. सर्वच प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये त्या-त्या मुख्याध्यापक, प्राचार्य, गुणवंत विद्यार्थी यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. करकंब येथील रामभाऊ जोशी प्रशालेमध्ये गतवर्षीच्या दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनी धनश्री कवडे हिच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सर्व शाळांमध्ये संगीत कवायतींसह विविध शालेय उपक्रम घेण्यात आले. राष्ट्रगीत, ध्वजगीत, संविधान, महाराष्ट्र गीत यासह वंदे मातरम् गीताचे सर्वच शाळांमधून गायन करण्यात आले. करकंब येथील न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेतील विद्यार्थ्यांचे नृत्याविष्कार, ऑपरेशन सिंदूर व योगा प्रात्यक्षिकांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मेंढापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक अनिल कांबळे यांच्या हस्ते झेंडा फडकविण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेली लेझीम, दंडबैठका व भारतीयम कवायत पाहून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. येथील शाळेस पुणे येथील कृषक भारती कंपनीतर्फे वॉटर फिल्टर देण्यात आला. तो कंपनीचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी गोपाळ नवले व कृष्णा गोदावरी सोसायटीचे व्यवस्थापक लक्ष्मण भुईरकर यांच्या हस्ते शाळेकडे सुपूर्त करण्यात आला. आजोती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ग्रामस्थांनी पंचवीस हजार रुपयांची लोकवर्गणी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

