Maharashtra Teacher Recruitment 2026: Pavitra Portal priority selection deadline extended to August 13
Sakal
पुणे : महाराष्ट्रातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम नोंदवून लॉक करण्याची मुदत आता १३ ऑगस्ट २०२६पर्यंत वाढविण्यात आली आहे. पोर्टलवर एकाच वेळी मोठ्या संख्येने उमेदवार लॉगिन करत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी उमेदवारांकडून करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.