esakal | Pune : पावणे पाच हजार कोटीच्या नदी सुशोभीकरण प्रकल्पाला गती
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal

पावणे पाच हजार कोटीच्या नदी सुशोभीकरण प्रकल्पाला गती

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेल्या मुळा-मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्पास गती देण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्याच्या प्रस्तावास गती देण्यात आली असून, आगामी पाच वर्षात या प्रकल्पासाठी ४ हजार ७२७ कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली.

'गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर मुळा-मुठा नदीच्या सुमारे ४४.४ किलोमीटर लांबीच्या काठाचे विकसन आणि संवर्धन करण्यासाठी महापालिकेने हा प्रकल्प हाती घेतला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून मुळा-मुठा नद्या वाहतात. याचा एकात्मिकरित्या विचार करून सल्लागाराची नियुक्ती केली होती, त्यानंतर या प्रकल्पाचे काम करण्यासाठी स्वतंत्र कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्यास राज्य शासनाच्या पर्यावरण खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

'या प्रकल्पासाठी नद्यांचे जलशास्त्रीय सर्वेक्षण, डिझाईन नकाशे तयार करणे, भूमी अभिलेख विभागाकडून नदीची हद्द निश्चित करणे, नदीच्या दोन्ही बाजूंच्या मिळकतींची मोजणी, सविस्तर प्रकल्प अहवाल आदी काम पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पासाठी ७६८ हेक्टर क्षेत्र लागणार आहे. नदीच्या वहनासाठी ५२६ हेक्टर, नदीच्या मजबुतीकरणासाठी १८० हेक्टर आणि विविध सुविधा पुरविण्यासाठी बासस्ट हेक्टर क्षेत्र लागणार आहे.'

या प्रकल्पामुळे दोन्ही नद्यांची वहनक्षमता वाढणार आहे. पात्रालगतच्या रहिवाशांना सुरक्षितता पुरविता येणार आहे. नदीकाठचे सुशोभीकरण होणार आहे, संपूर्ण नदीकाठ परिसरात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. नदीकाठची वारसा स्थळांचे संवर्धन करण्यात येणार आहे. नागरिकांसाठी उद्याने, जॉगिंग ट्रॅक, बसण्यासाठी बाकडी आदी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. प्रकल्प राबविण्यासाठी दोन हजार सहाशे एकोणीस कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याची माहिती ही स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

‘‘हा प्रकल्प खूप मोठा असून, पाच वर्ष याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली पाहिजे यासाठी प्रस्ताव मान्य केला आहे. ४ हजार ७२७ कोटीच्या या प्रकल्पाचे ११ टप्पे निश्‍चीत केले आहेत. त्यासाठी स्वतंत्र निविदा काढल्या जाणार आहेत. यातील काही टप्प्यांच्या निविदा मंजूर होऊन महापालिका निवडणुकीच्या आधी भूमीपूजन केले जाईल.’’

- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती

loading image
go to top