खामगाव येथील माजी विद्यार्थ्याची भूकरमापक पदी निवड

खामगाव येथील माजी विद्यार्थ्याची भूकरमापक पदी निवड

Published on

पवन मिसाळ
PGR26B03486

खामगावच्या पवन मिसाळची भू करमापकपदी निवड

पांगरी : खामगाव (ता.बार्शी) येथील आश्रम शाळा शैक्षणिक संकुल व त्रिवेणी बालकाश्रमचा माजी विद्यार्थी पवन मिसाळ याची महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख विभाग, नाशिक येथे ‘लँड सर्व्हेअर’ (भू करमापक) पदावर निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे संकुलासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पवन मिसाळ याने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असताना चिकाटी, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले. शालेय जीवनापासूनच अभ्यासात प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे तो शिक्षकांचा लाडका विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. त्याच्या मेहनतीमुळे आज त्याला राज्य शासनाच्या महत्त्वाच्या विभागात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याच्या या यशाबद्दल आश्रम शाळा शैक्षणिक संकुल व त्रिवेणी बालकाश्रम, खामगाव येथील शिक्षक व कर्मचारी वर्गाकडून सत्कार करण्यात आला. पवनच्या यशामुळे संकुलातील विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून मेहनत आणि जिद्दीच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com