पवना धरण अद्याप निम्मेही नाही भरले

Pawana-Dam-Water
Pawana-Dam-Water

पिंपरी - उशिरा आलेल्या पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे पवना धरणातील पाणीसाठा संथ गतीने वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बुधवारचा (ता. १७) साठा तब्बल ३० टक्‍क्‍यांनी कमी आहे. यामुळे शहरवासीयांच्या चिंता वाढली आहे.

यंदा २९ जूनला पावसाला सुरवात झाली. त्या वेळी धरणात अवघा १३ टक्‍के साठा शिल्लक होता. सुरवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. आत्तापर्यंत या परिसरात एक हजार ११८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर गेल्या २४ तासांत अवघ्या ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणातील पाणीसाठ्यात १.०९ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात आत्तापर्यंत ३०.०७ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. सध्या धरणात ४४.५३ (३.६९ टीएमसी) साठा आहे. गेल्या वर्षी १७ जुलैपर्यंत धरण परिसरात एक हजार ७७९ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्या वेळी धरणात ७५.१७ टक्‍के (६.४० टीएमसी) साठा होता. गेल्या वर्षी परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने सप्टेंबरपासूनच शहरासाठी पाणी सोडण्यास सुरवात झाली. दर महिन्याला साधारणतः धरणातून नऊ टक्‍के पाणी सोडावे लागते. तसेच ३१ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करावे लागत असल्याने महापालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठ्यास सुरवात केली. शंभर टक्‍के भरेपर्यंत कपात सुरूच राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com