Pawar Family Cancels Diwali Celebrations
esakal
पवार कुटुंबीयांनी यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
गोविंदबाग, बारामती येथे होणारा पारंपरिक पाडवा कार्यक्रमही रद्द केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी ही घोषणा समाजमाध्यमांद्वारे केली.
बारामती : यंदा पवार कुटुंबीयांकडून दिवाळी साजरी (Pawar Family Cancels Diwali Celebrations) केली जाणार नाही, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी समाजमाध्यमांद्वारे जाहीर केली आहे. दरवर्षीप्रमाणे गोविंदबाग येथे होणारा दिवाळी उत्सव आणि पाडव्याच्या भेटींचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.