माझी शाळा, माझा अभिमान” : पवारवाडीतील माजी विद्यार्थ्यांचा आदर्शवत पुढाकार
माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने
पवारवाडीतील शाळेचा विकास
आनेवाडी, ता. २५ : पवारवाडी (ता. जावळी) येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी संघटनेने पुढाकार घेत विविध कामे पूर्ण केली. ‘माझी शाळा, माझा अभिमान’ या संकल्पनेतून एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या गरजा ओळखून प्रत्यक्ष कृतीतून योगदान दिले.
या उपक्रमांतर्गत शाळेच्या नावाचा नवीन फलक बसविला. प्रत्येक वर्गासाठी नवीन कचराकुंड्या दिल्या. सभागृह, इयत्ता पाचवीचा वर्ग आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळील खड्डे भरून दुरुस्तीची कामे पूर्ण केली. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुबक वातावरण तयार झाले.
यापूर्वीही शाळेच्या वसतिगृहाच्या इमारतीसाठी ‘एनईएसपी’ या माजी विद्यार्थ्यांच्या समूहामार्फत रोख रक्कम व आवश्यक बांधकाम साहित्य उपलब्ध करून दिले होते. या सहकार्यामुळे वसतिगृह उभारणीच्या कामाला गती मिळाली. यापुढेही शैक्षणिक साहित्य, आवश्यक सुविधा आणि विविध उपक्रमांसाठी मदत करण्याचा निर्धार माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
यावेळी न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक महाडिक, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका शिवणकर, शंकरराव करंजकर, अरुण ढवळे, पोलिस पाटील राकेश वारागडे, अविनाश वारागडे, अमोल पवार, अजित पवार, राहुल वारागडे, संदीप पवार, नरहरी वारागडे आदी उपस्थित होते.
B02392
पवारवाडी (ता. जावळी) ः शाळेत एकत्रित जमलेले माजी विद्यार्थी. (प्रशांत गुजर ः सकाळ छायाचित्रसेवा)
............................................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

