

Pune Municipal Corporation
sakal
पुणे - पुणे महापालिकेने थकबाकीदार आणि परवाना नूतनीकरण न करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कठोर भूमिका घेतली असून ३१ मेपूर्वी नूतनीकरण न केल्यास संबंधितांना काळ्या यादीत टाकून त्यांची व्यवसाय साधने जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच अशा फेरीवाल्यांना पुढील पथविक्रेता सर्वेक्षणात सहभागी होता येणार नाही.