hawkers
sakal
पुणे - पुणे शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा गंभीर झालेला असताना दुसरीकडे अधिकृत पथारी व्यावसायिकांकडूनही महापालिकेला शुल्क भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आता प्रशासनाने थकबाकी वसुलीची मोहीम सुरु केली आहे. जर ३१ मार्चपर्यंत थकबाकी भरली नाही तर परवानाधारकाला व त्याच्या कुटुंबीयांना काळ्या यादीत टाकले जाणार आहे.