विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या - यूजीसी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

विद्यार्थ्यांबाबत अहवाल सादर करा
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर लॉकडाऊन काळात कशा प्रकारे तणावमुक्त राहता येईल, याबद्दल टिप्स दिल्या आहेत. तसेच, मानसिक स्थिती कशी ठेवावी यासाठी याचीही माहिती दिली आहे. मानसिक स्थिती चांगली ठेवण्यासाठीचे प्रात्यक्षिक कसे करावेत, याचीही लिंक ‘यूजीसी’ने दिली आहे. विद्यापीठ व महाविद्यालयांनी ही लिंक विद्यार्थ्यांना द्यावी. त्याचप्रमाणे, महाविद्यालयांनी हेल्पलाइन सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांना कशी मदत केली, याबाबतचा अहवाल विद्यापीठास सादर करावा असे ‘यूजीसी’चे सचिव रजनीश जैन यांनी परिपत्रकात नमूद केले आहे. 
तणावमुक्तीबद्दल टिप्स - www.mohfw.gov.in
यूजीसी हेल्पलाइन क्रमांक - ०८०४६११००७

पुणे - लॉकडाउनमुळे विद्यार्थी घरामध्ये बसून असून, परीक्षा आणि करियरच्या चिंतेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक व सामाजिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी हेल्पलाइन सुरू करून, समुपदेशन करावे असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला असून, १४ एप्रिलपर्यंत सर्व व्यवहार ठप्प आहेत. विद्यापीठांनी परीक्षा रद्द केल्या असून, त्या पूर्ववत कधी होतील याबद्दल विद्यार्थ्यांना विद्यापीठ किंवा महाविद्यालयांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

दरम्यान, लॉकडाउनचा कालावधी वाढल्यास परीक्षा कशी घेणार, प्रॅक्‍टिकल सबमिशन, अर्धवट राहिलेला अभ्यासक्रम याबद्दल अनेक प्रश्‍न विद्यार्थ्यांना पडले आहेत. त्यामुळे विद्यार्थी मानसिक तणावाखाली येऊन त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे ‘यूजीसी’ने सोमवारी (ता. ६) परिपत्रक काढून हेल्पलाइन संदर्भात विद्यापीठ, महाविद्यालयांना निर्देश दिले आहेत.

समुपदेशक नेमावेत 
विद्यार्थ्यांना अभ्यास, त्यांची तब्येत, कोरोनाची स्थिती याबद्दल कोणतीही भीती मनामध्ये असू नये, त्यांनी तणावमुक्त राहावे यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयस्तरावर हेल्पलाइन सुरू करावी. मोबाईल क्रमांक, इ-मेल किंवा सोशल मीडियाचा वापर हेल्पलाइन म्हणून करता येईल. योग्य मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी समुपदेशक आणि प्राध्यापक नेमावेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pay attention to students' mental health UGC