Palkhi 2025 : पालखी मार्गांवर दीड हजार फलकांची तपासणी, महापालिकेची कार्यवाही; सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याची सूचना
Pimpri Chinchwad : संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी महापालिकेने १,४९४ जाहिरात फलकधारकांना संरचनात्मक स्थिरतेची तपासणी व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
पिंपरी : संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पालखी मार्गांलगतच्या एक हजार ४९४ अधिकृत जाहिरात फलकधारकांना सुरक्षेसंदर्भात नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.