Video : नाच रे मोरा... अार्मीच्या बंगल्यात...नाच रे मोरा नाच...

प्रयागा होगे
शनिवार, 27 जून 2020

आकाशात काळे ढग जमू लागले की मोर पिसारा फुलवून नाचू लागतो, पिसारा फुललेला मोर व आजुबाजूला लांडोर असे मनमोहक दृश्य पुण्याच्या मध्यवर्ती परिसरात सध्या रोज पाहायला मिळते.

घोरपडी (पुणे) : आकाशात काळे ढग जमू लागले की मोर पिसारा फुलवून नाचू लागतो, पिसारा फुललेला मोर व आजुबाजूला लांडोर असे मनमोहक दृश्य पुण्याच्या मध्यवर्ती परिसरात सध्या रोज पाहायला मिळते. पावसाचे दिवस असल्याने सकाळी व संध्याकाळी घोरपडीकरांना मयूर नृत्यचा आनंद घेता येत आहे. लॉकडाऊनमध्ये ही रस्त्यावरून जाताना हा नाचणारा मोर पाहण्यासाठी व त्याचे फोटो काढण्यासाठी एकच झुंबड उडते.

'शरद पवारांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ माफी मागावी'​

 

लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर असलेल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या आवारात मोर रोज सकाळी व संध्याकाळी पिसारा फुलवून नृत्य करतो. मोठे आणि प्रशस्त बंगले आणि पावसामुळे हिरवागार झालेल्या या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे आणि झुडपे आहेत. त्यामुळे या परिसरात अनेक वेळा मोराचे दर्शन नागरिकांना होत असते. सकाळी मॉर्निंग वॉक आलेल्यांना मयुरनृत्य पाहायला मिळाल्याने नागरिक चांगलेच सुखावले जात आहेत. लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सगळेजण हे दृश्य पाहण्यात रंगून जातात. कामाला जाणारे नोकरदार लोक गाड्या थांबवून मयुरनृत्य पाहतात. मार्निंग वॉकला आलेले अनेक जण हे दृश्य  मोबाईलमध्ये टिपून घेतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आर्मी परिसरात मोठ्या प्रमाणात हिरवळ व पुरेशी मोकळी जागा आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून इथे मोर पाहायला मिळतात. विशेषतः पावसाळ्यात नाचणारा मोर या रस्त्यावरून प्रवास करताना दिसतो किंवा त्याचा आवाज ऐकू येतो. शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा वेगळा आनंद परिसरातील नागरिकांना मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात मोराचे अस्तित्व दिसून येत आहे. त्यामुळे लोकांना आपल्याच परिसरात निसर्गाच्या अनमोल देणगीचा लाभ मिळत आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

फातिमा नगर परिसरातील ख्रिश्चन स्मशानभूमीमध्ये अनेक वर्षांपासून मोराचं वास्तव्य आहे. साधारण आठ-दहा वर्षापूर्वी पासून त्या परिसरातील आजूबाजूच्या जागा विकसित होत असल्यामुळे मोरांनी नवीन जागा शोधत घोरपडी येथील आर्मी एरिया मध्ये आपला सहवास वाढवला. यामध्ये तीन ते चार मोर व सात - आठ लांडोर आहे. तसेच मुंढवा परिसरातील नदी शेजारील मोकळ्या जागेत आणि वन विभागाच्या जागेत काही मोर दिसू लागले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peacock dance can be seen in Ghorpadi