पुण्यात चोरट्यांनी पादचाऱ्यास लुटून पुलावरुन दिले ढकलून

पांडुरंग सरोदे
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

शिवाजी पुलावरुन पायी जाणाऱ्या एका नागरिकास चोरटयानी जबरदस्तीने पैसे काढत पुलावरुन खाली ढकलून दिले. त्यामुळे संबंधीत व्यक्ती नदीपात्रातील खडकावर आपटल्याने गंभीर जखमी झाले. त्यास उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पुणे : शिवाजी पुलावरुन पायी जाणाऱ्या एका नागरिकास चोरटयानी जबरदस्तीने पैसे काढत पुलावरुन खाली ढकलून दिले. त्यामुळे संबंधीत व्यक्ती नदीपात्रातील खडकावर आपटल्याने गंभीर जखमी झाले. त्यास उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

नारायण संतोष खांडागळे (वय 58, सध्या रा. धानोरी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. खंडागळे हे सोमवारी मध्यरात्री महापालिकेजवळील शिवाजी पुलावरुन जात होते.त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांना अडविले, दोघांनी त्यांच्याकडील पैसे जबरदस्तीने काढले. त्यानंतर त्यांना मारहाण करून पुलावरुन खाली ढकलले.

नदीपात्रातील खडकावर आपटल्याने त्यांच्या डोक्यास, हाताला व पायास गंभीर दुखापत झाली. याबाबत शिवाजीनगर पोलिसांना मंगळवारी सकाळी खबर मिळाली. त्यानंतर जीवरक्षक राजेश काची, संजय जाधव यांच्यासह पोलिस कर्मचारी समीर शेख, खर्चे यांनी खंडागळे यांना नदीपात्रातून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The pedestrian was robbed and pushed from bridge by thief in Pune