Accidentsakal
पुणे
Wagholi Accident : वाघोलीत भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू
वाघोली परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत एका पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
पुणे - वाघोली परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत एका पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. ६) रात्री घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

