Pune Crime : दागिने जपुन ठेवण्याचा सल्ला देणाऱ्या चोरट्यांनीच पळविले पादचारी महिलेचे दागिने!

दागिने चोरणाऱ्या चोरट्यांकडुन काय शक्कल लढविली जाईल, याची काही शक्‍यता नाही.
gold theft
gold theftsakal
Updated on

पुणे - दागिने चोरणाऱ्या चोरट्यांकडुन काय शक्कल लढविली जाईल, याची काही शक्‍यता नाही. पादचारी महिलेला भेटून 'या रस्त्यावर चोरटे खुप वाढलेत, त्यामुळे तुमचे दागिने काढुन पिशवीत ठेवा' असा सल्ला खुद्द चोरट्यांनीच महिलेला दिले. महिलेनेही त्यांच्यावर विश्‍वास ठेवत दागिने पिशवीत ठेवण्याचा प्रयत्न केला. शेवटी चोरच ते, महिलेस काही कळण्याच्या आतच तिच्याकडील दागिने चोरुन चोरट्यांनी धुम ठोकली!

किराणा दुकान फोडुन चोरट्यांनी पैशांसह दुकानातील बिस्कीटचे पुडे, तेलाच्या पिशव्या चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर आता चोरट्यांनी चोरी करण्यासाठी आणखी वेगळा फंडा वापरल्याचे चित्र पुढे आले आहे. कोंढव्यातील लक्ष्मीनगर परिसरात राहणाऱ्या एक महिला गुरुवारी (ता. 20) कात्रज-कोंढवा रस्त्याने पायी जात होत्या.

त्या टिळेकनगर परिसरात आल्या, तेव्हा त्यांना दोघांनी अडविले. त्यांनी महिलेस 'या भागात महिलांकडील दागिने चोरी करण्याच्या घटना खुप वाढल्या आहेत. तुम्ही तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवा,' अशी बतावणी केली. त्यांचा सल्ला महिलेने ऐकला. गळ्यातील 35 हजार रुपये किंमतीचे दागिने काढून महिलेने पिशवीत ठेवण्याचा प्रयत्न केला.

पण सल्ला देणारे शेवटी चोरटेच. त्यांनी महिलेस बोलण्यात गुंतवुन ठेवत, त्यांना काही कळण्याच्या आतच त्यांच्याकडील दागिने चोरुन तेथुन धुम ठोकली. या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुकेशिनी जाधव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com